काळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?
काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.
नवी दिल्ली : काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे. काळ्या पैशांच्या रकमेच्या 50 टक्के टॅक्स आणि त्यावर सरचार्ज लावून काळा पैसा पांढरा करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती आहे.
या आठवड्यामध्यचे केंद्र सरकार याबाबत अधिसूचना काढेल असं वृत्त पीटीआयनं दिली आहे. या योजनेनुसार काळा पैसा धारकांना त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगायची गरज पडणार नाही. तसंच काळा पैसा घोषीत करणाऱ्यांना वेल्थ टॅक्स, सिव्हील आणि इतर टॅक्स कायद्यामधून सुट मिळू शकते. पण टॅक्स चोरी करणाऱ्यांना पीएमएलए, नार्कोटिक्स आणि फॉरेन ब्लॅक मनी कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे.