देहरादून : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) वैज्ञानिकांना उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी नदीच्या किनारपट्टीवरील काही भागांत सोनं मिश्रीत तांब्याचं खनिज सापडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'करंट सायन्स जनरल'च्या माहितीनुसार, दगडांमध्ये आणि झऱ्यांच्या गाळात क्रमश: 475 पार्टस प्रति बिलियन (PPB) आणि 1.42 पार्टस प्रति बिलियन (PPM) सोन्याचे नमुने एकत्रित करण्यात आलेत. 


उत्तराखंडचा हा भाग लेसर हिमालयच्या नावानं ओळखला जातो. हा भाग उत्तरेकडून मेन सेंट्रल थ्रस्ट आणि दक्षिणेकडून नॉर्थ अल्मोडा थ्रस्टच्या मधोमध आहे. 


GSI च्या वैज्ञानिकांनी उत्तराखंडच्या लामेरी-कोटेश्वर भागातून 355 नमुने एकत्रित केलेत. त्यानंतर सोनं आणि इतर धातूंचं लखनऊच्या GSI च्या केमिकल डिव्हिजनमध्ये विश्लेषण करण्यात आलं. अहवालात सोन्यासोबत चाल्कोपायराईट, पायराईट, स्फालेराईट आणि गॅलेना असल्याचं समोर आलं. 


रुद्रप्रयाग भागात अशा पद्धतीनं सोनं आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.