नवी दिल्ली : GST लागू करण्याआधी GST कौन्सिलमध्ये कराचे  4 स्लॅब निश्चित करण्यासंदर्भात बहुतांश राज्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. जीवनावश्यक वस्तूंसाठी 6 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 26 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याखेरीज चैनीच्या वस्तूंवर सेसदेखील आकारण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वीच्या प्रस्तावानुसार चैनीच्या वस्तूंवर 40 टक्के कर लावण्याचा मुद्दा होता. याखेरीज 12 आणि 18 टक्के असे आणखी दोन स्लॅब असतील. जवळपास सर्व सेवा 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये सामील करण्यात येतील. तर काही सेवा आणि वस्तूंवर 12 टक्के कर लावण्यात येईल.  


याखेरीज राज्यांचा महसूल मोजण्यासाठी 2015-16 हे वर्ष आधारभूत मानण्यावरही या बैठकीत एकमत झालंय.  दरम्यान आज कराच्या दरांबाबत एकमत झालं, तर तीन दिवसांची ही बैठक आजच संपवण्यात येण्याची शक्यताय.