इटानगर : वस्तू आणि सेवा कर म्हणजेच (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेश या राज्यात मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव आज विधानसभेत मांडला. याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटीला आधीच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी मिळाली असून यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे बाकी आहे. विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते तमियो तागा यांनी या विधेयकाला आधीच 19 राज्यांनी मंजुरी दिल्याने चर्चेशिवाय याला मंजुरी द्यावी, असं म्हटलं आहे.


जीएसटीमुळे भविष्यात देशभरात करप्रणाली सुटसुटीत होऊन कराचा एकच दर कायम राहणार आहे.