नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झाले आहेत. एकूण १२११ वस्तूंमधून सात वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय. यात धान्य आणि दुधाचा समावेश आहे.


काय होणार स्वस्त...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यापूर्वी धान्यावर ५ टक्के कर होता. तर चहा, साखर ,कॉफी, खाद्य तेल आणि कोळशावर पाच टक्के कर लावण्यात येणार आहे. यापूर्वी कोळशावर ११.५ टक्के कर होता. तर केशतेल, साबण आणि टूथपेस्टवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळं महागाई कमी होण्याची चिन्ह आहेत. 
 


काय होणार महाग...


 
 चैनी वस्तूंवर जास्त कर आकारण्यात येणार असल्याचं दिसतंय. छोट्या कारवर २८ टक्के जीएसटी लावण्यात येणार असून त्यासोबत सेसही आकारण्यात येईल. तर लक्झरी कारवरती जीएसटीसह १५ टक्के सेस लावण्यात येईल. 
  एसी आणि फ्रीजचादेखील २८ टक्क्यांच्या टप्प्यात समावेश करण्यात आलाय. 


  
 जीएसटीचे चार टप्पे...  


  
  जीएसटीसाठी चार टप्पे करण्यात आले आहेत. यातल्या १४ टक्के वस्तूंवर पाच टक्के जीएसटी, तर १७ टक्के वस्तूंवर १२ टक्के जीएसटी, ४३ टक्के वस्तूंवर १८ टक्के जीएसटी तर १९ टक्के वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.