नवी दिल्ली: पाकिस्तानी गजल गायक गुलाम अलींचा मुंबईत होणारा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण रद्द झालेला हा कार्यक्रम आता 5 मार्चला दिल्लीला होणार आहे. गुलाम अलींचा 'घर वापसी' चित्रपटाचा संगीत प्रसिद्धी कार्यक्रम रद्द झाला होता. दिल्लीत होणऱ्या या कार्यक्रमाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुहैब इलियासी यांनी माहिती दिली.


घरवापसी चित्रपटातून गुलाम अली अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटामध्ये गुलाम अलींनी काही गझलही गायल्या आहेत. याआधी हा कार्यक्रम 29 जानेवारीला मुंबईत होणार होता. पण शिवसनेनं पाकिस्तानी कलाकारांना केलेल्या विरोधामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.