गुडगाव : पावसाचा देशभरात कहर पाहायाला मिळतोय. हरियाणात पावसाचा कहर सुरुच आहे. गुडगावमध्ये पावसाचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर साचले आहे. त्यामुळं गुडगावमध्ये तब्बल 15 ते 20 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर उपायुक्त टीएम सत्यप्रकाश यांनी हिरो हंडा चौकात कलम 144 लागू केलं. या अभूतपूर्व वाहतुक कोंडीवर शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांच्याशी चर्चा केली. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये पूराने हाहाकार माजलाय. शहरात चार दिवसांत 195 मिमि पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक भागांणध्ये पाणी साचले आहे.


या पावसाचा थेट वाहतुकीवर परिुणाम झालाय.अनेक भागांणध्ये नागरिकांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोटींची मदत घेण्यात येतेय. पावसामुळे वाहतुकी अडकलेल्या कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुट्टीच मिळाली. 


दरम्यान, भविष्यात पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे गुडगावमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार असल्याचं, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलंय. तर दोन दिवस पावसाच्या पाण्यामुळे गुडगावमध्ये झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.