लाल किल्ल्यात स्फोटकं सापडल्यानं खळबळ
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सापडलेल्या स्फोटाकांमध्ये काडतूस आणि हातबॉम्बचा समावेश आहे. लाल किल्ला परिसरांत हे घातक स्फोटक सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुरातत्व खात्याकडून लालकिल्याची पाहणी चालली होती, त्याचवेळी काडतूस आणि हात बॉम्ब एका कोप-यात सापडल दिसले. तपासणी केली असता हे काडतूस आणि ग्रेनेडची एक्सपायरी डेट संपल्याचे दिसून आले.
याठिकाणी २६ जानेवारी रोजी सुरक्षा व्यवस्था कडक होती त्यावेळी आर्मीचे जवान तैनात होते. त्यांचीच काडतूसं राहीलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यापूर्वी २००० मध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी लालकिल्ल्यात गोळीबार केला होता. त्यात ३ जवान शहीद झाले होते. त्यानंतर ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा मिळाला आहे.