नवी दिल्ली: संसदेवर हल्ला केलेला दहशतवादी अफजल गुरुला युपीए सरकारच्या काळात फाशी देण्यात आली, पण अफजलच्या बाबतीत घेण्यात आलेला निर्णय योग्य नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या कटात अफजलचा सहभाग कितपत होता, याबाबत मला शंका आहे, कोर्टाचा निर्णय लक्षात घेता अफजलला जन्मठेपेची शिक्षा देता आली असती, असंही चिदंबरम म्हणाले आहेत.


 अफजल गुरुला जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा चिदंबरम हे अर्थमंत्री होते, तर सुशील कुमार शिंदे हे गृहमंत्री होते. जेएनयुमध्ये अफजलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्यानं आधीच मोठा वाद झाला आहे. त्यातच आता चिदंबरम यांनी हे वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसची मात्र गोची व्हायची शक्यता आहे.