अहमदाबाद : गुजरातमधील पटेल आरक्षणाच्या आंदोलनात चर्चेत आलेला पटेलांचा स्वघोषित नेता हार्दिक पटेल आता बोहल्यावर चढणार आहे. सध्या तुरुंगात असलेला हार्दिक तिथून बाहेर आल्यावर लग्न करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी अहमदाबाद येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हार्दिक याच्या आई-वडिलांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्याची प्रेमिका असलेली किंजल पटेल हिच्याशी तो लग्न करणार आहे. किंजल ही हार्दिकची धाकटी बहीण मोनिका हिची मैत्रीण आहे. 


२०१५ सालच्या ऑक्टोबर महिन्यात २२ वर्षीय हार्दिकने पाटीदार समाजाच्या आरक्षणावरुन गुजरातचे राजकारण ढवळून काढले आणि तो चर्चेत आला. त्यानंतर त्याने केलेल्या आंदोलनानंतर त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. तेव्हापासून तो सूरत येथील केंद्रीय कारागृहात बंद आहे. 


तुरुंगातून सुटल्यावर हार्दिक यांचा साखरपुडा आणि लग्न होणार आहे. सध्या तुरुंगातून त्याचा किंजल हिच्याशी पत्रव्यवहार करत असल्याची माहिती आहे. किंजलच्या प्रेरणेमुळे तो कारागृहातच पाटीदार समाज आणि आंदोलन याविषयी एक पुस्तकही लिहीतो आहे.