चंदीगड: देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोमांस खायला बंदी घालण्यात आली आहे. हरियाणामध्येही राज्य सरकारनं गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या कायदा तोडणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे. 


पण परदेशी नागरिकांना गोमांस खायला परवानगी द्यायचा विचार हरियाणा सरकार करत आहे, खुद्द मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच असे संकेत दिले आहेत. यासाठी वेगळं लायसन्स द्यायचाही हरियाणा सरकारचा विचार आहे.