नवी दिल्ली : ८०० करोडोंचं कर्ज बुडवणारा 'लिकर किंग' विजय माल्या परदेशात जाण्याची परवानगी द्यायची किंवा नाही, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाचा निर्णयाआधीच विजय माल्या भारतातून सटकलाय, अशी माहिती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयसहीत १७ बँकांनी विजय माल्याच्या परदेश जाण्यावर बंदी आणण्याची मागणी केलीय. परंतु, टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, माल्या कोर्टाच्या निर्णयाआधीच भारतातून निसटलाय. विजय माल्याच्या प्रवक्त्यानंही या गोष्टीला दुजोरा दिलाय. परंतु, तो ज्या देशात गेलाय त्या देशाचं नाव सांगण्यास मात्र त्यानं नकार दिला. 


विजय माल्या जाणूनबुजून हे कर्ज चुकवू इच्छित नाही, असा आरोप बँकांनी केलाय. न्यायव्यवस्थेपासून वाचण्यासाठी तो भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होऊ इच्छितोय. 


ईडीनं मनी लॉन्डरिंग अॅक्टनुसार विजय माल्यावर केस दाखल केलीय. आयडीबीआय बँकेकडून घेतलेलं ९०० रुपयांचं कर्ज न चुकवण्यावरून ईडीनं हा गुन्हा दाखल केलाय.