नवी दिल्ली : रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. राम मंदीर उभे करण्याचे आंदोलन म्हणजे सत्व जागरणाचे आंदोलन आहे. हा हिंदूंचा देश असल्यामुळे राम मंदिर बनायलाच हवे. अशा शब्दांत मोहन भागवतांनी राम मंदिर बांधण्याचे समर्थन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू सर्वसमावेशक आहेत. हिंदू-मुस्लिम कलह धार्मिक कारणांमुळे नाही तर राजकारणामुळे होतो, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत. संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवनिमित्त दिल्लीत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं. वैश्विक भारतीय संस्कृती-मानव एकात्मता दर्शन विषयावर दोन दिवसाची कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे आयोजन विश्व शांती केंद्र आणि एमआयटीतर्फे करण्यात आले. 


या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, डॉ विजय भटकर, मंत्री पंकजा मुंडे, राम मंदिर न्यासचे डॉ रामविलास वेदांती उपस्थित होते. यावेळी बोलताना हिंदू धर्माच्या वैशिष्ट्यांवर भागवतांनी प्रकाश टाकला.