एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोजावे लागणार 150 रुपये
आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
नवी दिल्ली : आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँकेसह इतर बँकांची रक्कम काढण्यावर शुल्क आकारणी सुरू होणार आहे. दर महिन्याला 4 व्यवहार निशुल्क असणार आहेत.
पाचवा व्यवहार आणि त्यानंतरच्या व्यवहारांवर 150 रुपयांचे शुल्क आकारणारी होणार आहे. आधी तुम्हाला पाचव्या व्यवहारानंतर 20 रुपये मोजावे लागत होते. आता तर पाचव्या व्यवहाराला 150 रुपये मोजावे लागणार आहे. तर हजारला 5 रुपये अधिकचे द्यावे लागणार.