सूरत : जगात चमत्कारिक लोकांची कमतरता नाही असं म्हटलं जातं. मात्र रबराप्रमाणे आपले हात-पाय फिरवणारा व्यक्ती तुम्ही पाहिला आहे का. मात्र सुरतमध्ये असा एक मुलगा आहे, ज्याचं नाव आहे यश शाह. यश आपले हाथ आणि पाय 360 अंशांमध्ये लिलया फिरवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर आपली मानसुद्धा हा 180 अंशाच्या कोनात अगदी सहजगत्या फिरवतो. हे करताना त्याच्या चेह-यावर कुठलाही त्रास पाहायला मिळत नाही. त्याच्या शरीरात जणू काही हाडं नसून रबर आहे की काय असं तुम्हाला वाटेल. यश गेल्या तीन वर्षांपासून युट्यूबवर डॅनियल ब्राऊनिंग स्मिथ यांचे व्हिडीओ पाहतो. 


हे व्हिडीओ पाहूनच आपले हाथ-पाय आणि मान तो हवी तशी फिरवू शकतो. आता यशला आपल्या या अदभुत करामतीची नोंद गिनीज बुकात करण्याची इच्छा आहे. तसंच मोस्‍ट फ्लेक्सिबल इंडियन जसप्रीत सिंह याचा रेकॉर्ड त्याला तोडायचा आहे.