केजरीवाल यांना सॅण्डल खरेदीसाठी एकाने पाठवले ३६४ रूपये
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शूज घेण्यासाठी, एका इंजीनिअरने ३६४ रूपयांचा डीडी पाठवला आहे. दिल्लीचे सीएम केजरीवाल यांना विशाखापट्टणचा इंजीनिअर सुमित अग्रवालने जाहीर पत्र लिहलं आहे.
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शूज घेण्यासाठी, एका इंजीनिअरने ३६४ रूपयांचा डीडी पाठवला आहे. दिल्लीचे सीएम केजरीवाल यांना विशाखापट्टणचा इंजीनिअर सुमित अग्रवालने जाहीर पत्र लिहलं आहे.
जाहीर पत्रात सुमितने केजरीवाल यांना म्हटलंय, तुम्ही महत्वाच्या कार्यक्रमाला हजर असतात, तेव्हा सॅण्डल घालत जाऊ नका, असं सॅण्डलने जाणं अख्ख्या देशाला लाज आणणारं आहे, असं सुमित अग्रवालने म्हटलं आहे.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद हजर होते. राष्ट्रपती भवनातल्या एका कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सॅण्डल घालून एका कार्यक्रमात उपस्थित होते, हे पाहून आपल्याला धक्का बसल्याचं सुमितने पत्रात म्हटलं आहे.
तेव्हा आपण रस्त्यावर उतरलो आणि तुमच्या शूजसाठी पैसे जमा केले तेव्हा ३६४ रूपये जमा झाले, यात शूज येणार नसले तरी, मी हे पैसे आपणसा डीडी करून पाठवत असल्याचं सुमित अग्रवालने म्हटलंय.
मात्र खरोखरं केजरीवाल यांना शूज घेण्यासाठी ३६४ रूपये पाठवणे योग्य आहे का? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सूट-बुटचा प्रोटोकॉल असेल तर तो पाळायला हवा होता का?, असा प्रश्न उपस्थित आहे.