नवी दिल्ली :  उत्तर भारतात थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. सकाळपासून पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक कोलमडले आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये धुक्यामुळे ट्रक आणि बसचा अपघात झालाय. या अपघातात 7 जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा धुक्याचं साम्राज्य पसरलंय. सकाळपासून पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक कोलमडलेत. दाट धुक्यामुळे दिल्ली आणि लखनऊ विमानतळावर याचा सर्वाधिक फटका बसला. 


दिल्लीत नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच थंडी आहे. आज सकाळपासून कडाक्याची थंडी असून वाऱ्यासोबतच धुक्याची चादर दिसत आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यावर समोर २०० ते ३०० मीटर अंतरावरील चित्रही नीट दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावलेला दिसला.  


अलिकडच्या काळात दिल्लीत वाढलेले प्रदूषण पाहता या नैसर्गिक धुक्यात प्रदुषणाचाच अंश अधिक असल्याचे म्हटले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून या महिन्याच्या सुरूवातीला दिल्लीवासियांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागला होता. प्रदूषित धुक्यामुळे अनेकांना श्वसन विकार, डोळे चुरचुरणे, घसा खराब होणे तसेच इतर संसर्ग झाले होते. यावर उपाय म्हणून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिल्ली सरकारने दिला होता. तर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.