ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पुणे : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे. देशभरात या दोन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 107 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
यंदाच्या वर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस (89 टक्के) पडला, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 107 टक्के पाऊस पडल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.