नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळांना २९ जुलै आणि ३० जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलीय. ट्राफीक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे ट्राफीक हटवण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. इथं गाड्या गेल्या १४ तासांपासून अडकून पडल्यात. 


दिल्ली-जयपूर महामार्गावर ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं हरियाणातल्या गुरुग्राममध्ये रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक ठिकाणी तर नागरीक १२ ते १४ तासांपासून अडकून पडलेत. 


मुसळधार पावसानं बादशाहपूर नाला तुटल्यानं रस्त्यांवर काही फूट पाणी साचलंय. त्याचा परीणाम दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतुकीवर झालाय.


बस, ट्रक या अवजड वाहनांसह कार आणि दुसरी हलकी वाहनं रस्त्यावर अडकलीय. संततधार पावसानं गुरुग्राम परीसरात जनजीवन विस्कळीत झालंय. अजूनही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.