आगरा : उत्तरप्रदेशच्या मथुरामध्ये झालेल्या हिंसेनंतर भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर जोरदार टीका होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मथुरेत अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना हिंसा घढून आली. या दरम्यान खासदार हेमा मालिनी मुंबईत मढ येथे चित्रीकरणामध्ये व्यस्त होत्या. तसंच हेमा मालिनी यांनी ट्विटरवर आपल्या नव्या सिनेमाच्या शुटींग दरम्यानचे काही फोटोही शेअर केले. त्यामुळे, त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. सोशल मीडिया कुणालाही सोडत नाही... अर्थातच हेमामालिनीही सोशल मीडियाच्या टार्गेटवर आल्या. 


२४ जणांनी गमावला जीव... 


हेमा मालिनी या मथुरेतून खासदार म्हणून निवडून आल्यात. गुरुवारपासून इथं हिंसा सुरू आहे. आत्तापर्यंत एसपी-एसएचओ यांसोबतच २४ लोकांनी आपला जीव या हिंसेत गमावलाय.


हेमा मालिनींनी फोटो केले डीलीट


सोशल मीडियावर यामुळे चांगलीच टीका सहन करावी लागल्यानंतर हेमा मालिनी यांनी लगेच ते फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून काढून टाकले. मी आत्ताच मथुरेतून परतले होते, आणि लगेचच आपल्याला या हिंसाचाराची माहिती मिळाली, असंही त्यांनी म्हटलंय. जर गरज असेल तर मी तातडीनं तिथं उपस्थित होईन, असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.


दरम्यान, आपण मथुरेकडे रवाना झाल्याचंही त्यांनी ट्विट केलंय.