शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या थंडीची कडाक्याची लाट आहे. त्यामुळे सिमला, मनाली यासह अनेक ठिकाणी बर्फाची पांढरीशुभ्र चादर पांघरली गेल्याचंच दिसून येतं आहे. रस्ते, घरं, कौलं झाडं, सगळीकडे बर्फाचा नुसता पांढरा थर दिसून येत आहे. यामुळे हिमाचल प्रदेशमधलं जनजीवन पुरतं प्रभावित झालंय. बर्फामुळे अक्षरशः पाईपलाईनमध्ये पाणीही गोठून गेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान बर्फवृष्टीमुळे कुफ्रीकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाच बंद केला गेला. तर जम्मू काश्मीरमध्येही हेच चित्र पाहायला मिळतंय. श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाचा थर साचला आहे. रस्ते, इमारती, झाडं जिथे नजर जाईल तिथे बर्फाच्या पांढऱ्या दुलई खेरीज काहीच दिसत नाही. 


पारा कमालीचा खाली घसरल्याने थंडीने नागरिक अक्षरशः गारठून गेले आहेत. तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महमार्ग बर्फवृष्टीमुळे ठप्प झाला आहे. यामुळे काश्मीर खो-यातले दैनंदिन व्यवहार चांगलेच प्रभावित झाले आहेत.