नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त सुरंग सापडलाय. ५ मार्च रोजी हा सुरुंग सापडला होता. त्याची लांबी तब्बल ७ किलोमीटर आहे. हा सुरुंग दिल्ली विधानसभेपासून थेट लाल किल्ल्यापर्यंत जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विधानसभेचं अधिवेशन ज्या इमारतीत पार पडतं त्याच इमारतीखाली हा सुरुंग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सुरुंग इंग्रजांच्या काळातील आहे. 


काय आहे या सुरुंगाचं गूढ


इतिहासात उल्लेख केल्याप्रमाणे, स्वाधीनता संग्रामच्या अखेरच्या दिवसांत इंग्रजांनी सध्याच्या दिल्ली विधानसभा इमारतीला न्यायालयाचं स्वरुप दिलं होतं. त्यावेळ, दिल्ली विधानसभेच्या इमारतीच्या मागच्या बाजुला फाशी देण्याचं ठिकाण बनवण्यात आलं होतं. इथं लाल किल्ल्यात बंदिस्त करून ठेवलेल्या क्रांतीकारकांना या सुरुंगातून दिल्ली विधानसभेच्या मागच्या बाजुच्या फाशीघरात नेऊन फाशी दिली जात असे.


कसा उजेडात आला हा सुरुंग


दिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३ मध्ये पहिल्यांदाच आमदार बनल्यानंतर विधानसभा कर्मचाऱ्यांना या सुरुंगाबद्दल आपल्याला थोडी माहिती दिली होती. त्यानंतर माजी आमदार किरण चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी उत्सुकता व्यक्त केली. त्यानंतर एक चौकशी समिती नेमून हा सुरुंग शोधून काढण्यात आलाय.