नवी दिल्ली :  ११ मार्च २०१७ ला छत्तीसगडच्या  सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएएफचे १२ जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबांना  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने प्रत्येकी  लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयने एकूण एक कोटी ८ लाख आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयच्या या दातृत्वाबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्याचे कौतुक केले आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनेनंतर लगेच अक्षयने मंत्रालयाशी संपर्क साधला. तसेच त्याने शहीद परिवाराच्या कुटुंबायांना पैसे देण्यासाठी अकाउंट नंबर मागितले होते.  अक्षय कुमार यांची मागणी पूर्ण करत त्यांना शहीद कुटुंबियांचे बँक अकाउंट नंबर उपलब्ध करू दिले. 


राजनाथ सिंग याने याबाबत ट्विट करतांना म्हटले की, तुमचे दातृत्व प्रशंसनीय आहे.  हे पाऊल इतर देशवासियांना शहीदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रेरीत करू शकते.