डेहराडून : भाजप नेते  आणि भाजप आमदार गणेश जोशी यांनी मारहाण केल्याने जखमी झालेल्या ‘शक्तिमान' घोड्याचा अखेर मृत्यू झाला. 


गुन्हा दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘शक्तिमान'ला मारहाण करण्यात आल्याने सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. मारहाण प्रकरणी उत्तराखंडमधील मसुरी येथील भाजप आमदार गणेश जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जामिनावर सुटका


उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात आंदोलन करताना हा प्रकार घडला होता. जोशी यांनी ‘शक्तिमान'ला बेदम मारहाण केली होती. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गणेश जोशी यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर मिळालाय.


मारहाणीचे समर्थन


या प्रकारानंतरही जोशी यांनी या मारहाणीचे समर्थन केले होते. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी घोड्यांचा वापर केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत घोड्याला दुखापत झाली. यात चुकीचे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले होते.


सिलिब्रिटींकडून तीव्र नाराजी 


दरम्यान, सिलिब्रिटींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अभिनेत्री आलिया भट, अनुष्का शर्मासह इतर बॉलिवूड अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली यानेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.