मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या नव्या लुकची चर्चा सर्वत्र होतेय. कारणही तसेच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत अंबानीने तब्बल १८ महिन्यात १०८ किलो वजन कमी केलेय.नीता अंबानी आपल्या मुलाच्या प्रयत्नावर चांगल्याच खुश आहेत.


असा होता वजन घटवण्याचा अनंतचा प्रवास


1. नैसर्गिक पद्धतीने अनंतने १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी केले. म्हणजेच एका महिन्यात त्याने ६ किलोपर्यंत वजन कमी केले.


2. दीड वर्षापूर्वी त्याने स्वत:च्या मनाशी ठरवले होते की  २१व्या वाढदिवसापर्यंत वजन घटवायचेच आणि त्याने ते साध्य केले.


3. दिवसातून पाच ते सहा तास तो व्यायाम करायचा. तसेच योग्य डाएटही करत असे. 


4. त्या दैनंदिन जीवनशैलीत तो २१ किमी दररोज चालायचा. त्यानंतर योगा, वेट ट्रेनिंग, कार्डिओ एक्सरसाईज करत असे. 


5. अनंतच्या डाएटमध्ये झिरो शुगर, कमी कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचा समावेश असे. मात्र पुरेशा प्रमाणात फॅट आणि प्रोटीन तत्वांचा समावेश असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करत असे. 


6. लहानपणी अनंतला तीव्र दम्याचा त्रास होता. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे हे त्याच्यासाठी खरंतर मोठे आव्हानच होते.


7. अनंतच्या या मेहनतीबद्दल त्याची आई नीता अंबानी खूप खुश झाल्यात.