नवी दिल्ली : देशात आणि राज्यात देखील मंत्र्यांच्या डीग्रीवरुन अनेक वाद झाले. अनेक नेत्यांच्या डीग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षण किती यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न विचारल्यावर मोदींचं खरंच शिक्षण किती याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता लागली असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरविंद केजरीवाल यांनी सेंट्रल इन्फॉर्मेशन कमीशन विद्यापीठाला एक पत्र लिहून मोदींच्या डिग्रींबाबत विचारणा केली आहे. पण विद्यापीठातून याबाबत केजरीवालांना अजून तरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण नरेंद्र मोदींनी गुजरात विद्यापीठातून एमए इन पॉलिटीकल सायन्समध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे अशी सूत्रांतती माहिती आहे. नरेंद्र मोदी इतर मुलांच्या सरासरी पेक्षा पुढे होते.


गुजरातमधील एका वृत्तपत्राची माहिती


पंतप्रधान मोदींनी १९८३ मध्ये डीग्री मिळवली आहे. तसेच ६२.३% मार्क्स मिळाले होते. काही दिवसांपूर्वी विद्यापीठातून केजरीवाल यांनी मोदींच्या शिक्षणाचे पुरावे आणि त्यांनी किती मार्क्स मिळवले त्याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.


गुजरात विद्यापीठाची माहिती


एमएच्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात युरोपियन पॉलिटिक्स, इंडियन पॉलिटिकल एनालिसिस, सायकोलॉजी आणि पॉलिटिक्स असे विषय होते. त्यामध्ये त्यांनी (पॉलिटिकल सायन्स) मध्ये ४०० पैकी २३७ आणि दुसऱ्या वर्षात ४०० पैकी २६२ मार्क्स मिळवले. म्हणजे मोदींना एमएमध्ये ८०० पैकी ४९९ मार्क्स होते. त्यांनी डिग्री ही विसनगरमधील एमएन सायन्स कॉलेजमधून पूर्ण केलं होतं.


नरेंद्र मोदींना मिळालेले गुण


पॉलिटीकल सायन्स : ६४ / १००
युरोपियन एड सोशल पॉलिटीकल थॉट्स : ६४ / १००
मॉर्डन इंडिया पॉलिटीकल अॅनालिसीस : ६९ / १००
पॉलिटिकल सायकोलॉजी :  ६७ / १००
-मोदी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांच्याबरोबर गुजरातच्या सीएम आनंदीबेन पटेल ह्या ऑर्गनिक केमिस्ट्रीमध्ये एमएससीच्या दुसऱ्या वर्षाला होत्या.


विद्यापीठ अगोदर मोदींच्या शिक्षणाविषयी कोणतीही माहीती द्यायला तयार नव्हते. कारण ते कोणाचीही वैयक्तिक माहिती देत नाही.
विद्यापीठाने दुसरी गोष्ट अशी केली की हा रेकॉर्ड २० वर्ष जुना आहे. त्यामुळे आरटीआयच्या नियमांनुसार हा रेकॉर्ड आम्ही जाहीर करु शकत नाही.