भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रत्येक कॉलेजने किमान १०० विद्यार्थी पाठवावेत, असा आदेश मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांची १४ एप्रिल रोजी महू येथे जाहीर सभा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने या आदेशावरून भाजपवर टीका केली आहे, 'आपल्या सभेसाठी लोकांची गर्दी होईल का?, याची खात्री भाजपला नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.  
इंदूरपासून ३० किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


महू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मठिकाण असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रत्येक खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाने १०० विद्यार्थी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी काहींच्या सध्या परीक्षा चालू आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांकडे स्वतःची वाहने नसल्याने या कार्यक्रमाला जाण्यात त्यांना अडचणी आहेत. प्रत्येक महाविद्यालयाने बसची व्यवस्था करावी, तसेच विद्यार्थ्यांसोबत एक शिक्षक पाठवावा, असे सांगण्यात आले आहे.