२००० ची नकली नोट आली समोर, पाहा कशी ओळखाल खरी नोट
८ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागणं सुरु झाल्या. त्यातच आता बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : ८ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागणं सुरु झाल्या. त्यातच आता बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान बॉर्डरजवळील तरनतारन येथून भिखीविंडमध्ये या टोळीने २००० च्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. या टोळीला पोलिसांनी पकडलं आहे. २ जणांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. पंजाब पोलिसांनी 2000 च्या ५ बनावट नोटा, एक स्कॅनर आणि कंप्यूटर जप्त केलं आहे.
२००० ची नोट खरी की खोटी कसे ओळखावे
1. नोट लाईटच्या खाली धरल्यास त्याला ४५ डिग्रीच्या अँगलने पाहिल्यास 2000 चा आकडा दिसेल.
२. देवनागरी भाषेत 2000 चा आकडा आहे.
4. मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो आहे.
5. छोटे-छोटे अक्षरों में RBI और 2000 लिखा है।
6. सिक्योरिटी थ्रीडवर भारत, RBI आणि 2000 लिहिलं आहे. त्याला थोडं माडून पाहिल्यास थ्रीडचा रंग निळा दिसेल.
7. गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरचे हस्ताक्षर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डाव्या बाजुला आहे.
8. महात्मा गांधींच्या फोटोवर इलेक्ट्रोटाइप (2000)चा वॉटरमार्क आहे.