लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनऊमध्ये घेतलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भाजपच्या नेत्यांनी विचारही केला नसेल एवढी गर्दी मोदींच्या या सभेला झाली होती. रमाबाई मैदानामध्ये झालेल्या या सभेत मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. मोदींच्या रॅलीसाठी तब्बल चार किमीपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढी मोठी गर्दी बघून भाजप अध्यक्ष अमित शहा भलतेच खुश झाले आणि त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये भाजपला दोन तृतियंश बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. रॅलीच्या आधी पत्रकारांनी मला उत्तर प्रदेशमध्ये कोणाचं सरकार येईल असा प्रश्न विचारला होता. आता उत्तर प्रदेशमध्ये दोन नंबरवर कोण राहिल असे प्रश्न विचारतील, असं अमित शहा म्हणाले.