हैदराबाद : पत्नी सोशल मीडिया माध्यम फेसबूकवरून मित्राशी चॅटींग करीत असे. तसेच तिचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचे तुकडे करुन एका बॅगेत भरले. ही बॅग घेऊन कारने विल्हेवाट लावण्यासाठी वापर केला. पण कारचे चाक रुतल्याने सारा प्रकार पुढे आला.


पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश कुमार अग्रवाल (३६) असे त्याचे नाव आहे. सिंथिया (३१) ही त्याची पत्नी. ती दक्षिण आफ्रिकन आहे. व्यवसायाने शेअर दलाल असणारा रुपेश काँगोमध्ये असताना त्याचे सिंथिया बरोबर सुत जुळले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
 
२००८ मध्ये काँगोमध्ये लग्न केले आणि त्यानंतर ते हैदराबादला राहायला आले. सिंथिया एका फ्रेंच तरुणाच्या प्रेमात पडली होती. फेसबुकवरुन तिचे त्याच्याशी रोज चॅटिंग होत असे. या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या रुपेशने सिंथियाची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि बॅगेत भरले.
 
रात्री रुपेश बॅग घेऊन निर्जन स्थळी घेऊन गेला. पण तिथे त्याच्या कारचे चाक चिखलात रुतले आणि हा प्रकार उघड झाला. गाडीचे रुतलेले चाक बाहेर काढण्यासाठी रुपेशने तिथल्या स्थानिक युवकांची मदत घेतली. त्यांना गाडीमध्ये रक्ताचे डाग दिसले. तसेच त्यांना झुडपातून धूर येत लक्षात आले. या युवकांचा संशय बलावला. या तरुणांनी रुपेशला पकडून ठेवले आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर हा सारा प्रकार उघड झाला.