जम्मू : जम्मूच्या कटरा भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे रहिवासी असलेले लक्ष्मी गुप्ता (२५ वर्ष) आणि शक्ती गुप्ता यांच यंदा १० मार्च रोजी लग्न झालं होतं. लग्नाला चार महिनेही पूर्ण झाले नाही आणि लक्ष्मीचा संशयास्पद मृत्यू झाला. 


लक्ष्मीचा पती शक्ती यानं अर्धकुमारी इथं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. परंतु, शक्तीच्या जबानीत पोलिसांना संशयाचा वास आला. त्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.


नात्यातला तणाव... 


पोलिसांनी या दोघांच्या घरी संपर्क साधला असता लक्ष्मी आणि शक्ती यांच्या नात्यात तणाव असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी शक्तीची कसून चौकशी केली आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला. 


कसा झाला लक्ष्मीचा मृत्यू...


शक्तीनं लक्ष्मीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यानं अंधाराचा फायदा घेत लक्ष्मीचा मृतदेह लांबीकेरी भागात नेऊन तिथून खाली ढकलून दिला, असं शक्तीनं कबूल केलंय.