...म्हणून त्यानं पसरवली विमान हायजॅकची अफवा
आपल्या गर्लफ्रेडला रोखण्यासाठी `विमान हायजॅक`ची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद टास्क फोर्सनं अटक केलीय.
हैदराबाद : आपल्या गर्लफ्रेडला रोखण्यासाठी 'विमान हायजॅक'ची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद टास्क फोर्सनं अटक केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय आरोपी वम्शी कृष्णा यानं मुंबई पोलिस आयुक्तांना एक ई-मेल धाडला होता. विमान हायजॅक होण्याची शक्यता असल्याचं त्यानं या ई-मेलमध्ये लिहिलं होतं. रविवारी आपण काही अज्ञात लोकांना हैदराबाद, मुंबई आणि चेन्नई एअरपोर्टजवळ तीन विमानांना हायजॅक करण्यात येणार असल्याचं आपल्या कानी पडल्याचं त्यानं या ईमेलमध्ये म्हटलं होतं.
मुंबई पोलिसांनी हा ई-मेल मुंबई एअरपोर्ट सिक्युरिटी ग्रुपकडे धाडला. त्यानंतर हायअलर्ट जारी करण्यात आला. तपास करताना हैदराबाद पोलिसांना यामागे कृष्णा असल्याचं आढळलं.
चेन्नईमध्ये राहणाऱ्या आपल्या एका मैत्रिणीला रोखण्यासाठी कृष्णानं हे कृत्य केलं होतं, असंही तपासात समोर आलं. कृष्णाची मैत्रिण मुंबई आणि गोव्याला जाताना हे फ्लाईट घेणार होती... तिचा दौरा रद्द करण्यासाठी त्यानं हे कृष्णकृत्य केल्याचं समोर आलं.