COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद : सार्वजनिक कार्यक्रमात जेएनयूमधला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या दिशेनं चप्पल भिरकावण्याचा प्रकार घडलाय. 


कन्हैयासारख्या देशद्रोह्याला बोलू द्यायला नको अशा घोषणा देत कार्यक्रमातल्या एकानं कन्हैयाच्या दिशेनं चप्पल फेकली. 


त्यानंतर तातडीनं पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्याला कार्यक्रमातून बाहेर नेत ताब्यात घेतलं, अशा प्रकारांना आपण घाबरत नसून यापुढंही निर्भि़डपणे आपले विचार मांडतच राहू, असा निर्धार कन्हैयानं व्यक्त केलाय. 


कन्हैया कुमार हैदराबाद आणि विजयवाडाच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आहे. देशातल्या शैक्षणिक संस्थांवर हल्ले होत असल्याचा आरोप कन्हैया कुमारनं केलाय.