महिलेने मोदींकडे केली स्टोलची मागणी...पाहा काय उत्तर दिले पंतप्रधानांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. यामुळेच अनेक लोक त्यांच्या मागण्या ट्विटरद्वारे पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतात. असंच काहीस पुन्हा घडलंय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. यामुळेच अनेक लोक त्यांच्या मागण्या ट्विटरद्वारे पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतात. असंच काहीस पुन्हा घडलंय.
शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्त पंतप्रधान मोदींनी कोईम्बतूर येथील 112 फूटाच्या शंकराच्या मूर्तीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक स्टोल परिधान केला होता. महाशिवरात्रीच्याच संध्याकाळी शिल्पी तिवारी नावाच्या महिलेने पंतप्रधानांचा तो उद्घाटनसमयीचा फोटो टाकत पंतप्रधानांनी परिधान केलेल्या स्टोलची मागणी केली. आणि काय आश्चर्य 21 तासांत तिला तो स्टोल पंतप्रधान मोदींकडून गिफ्ट मिळाला.
पंतप्रधान मोदींकडून मिळालेल्या या खास गिफ्टसाठी शिल्पाने आणखी एक ट्विट करुन आभार मानले. या ट्विटमध्ये तिने असं म्हटलंय, आधुनिक भारताचे कर्मयोगींचा आशीर्वाद मिळाल्याने मी खुप खूश आहे. पंतप्रधान रोज हजारो मैल चालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला त्यांचा आशीर्वाद पाठवून दिलाय. एक दिवस आधीच मी त्यांच्याकडे या स्टोलची मागणी केली होती. मी स्वप्न तर पाहत नाहीये ना?