नवी दिल्ली : बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.


असं असेल ठराविक व्यवहारानंतरचं शुल्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना महिन्यातल्या पहिल्या चार व्यवहारांवर कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. यानंतर प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये द्यावे लागतील. ज्या शहरामध्ये ग्राहकाचं खातं असेल तिकडेच ही सुविधा मिळणार आहे.


- आयसीआसीआयच्या दुसऱ्या शाखांमध्ये पहिल्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क लागणार नाही. यानंतर प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये द्यावे लागतील.


- आयसीआयसीआय बँकेच्या होम ब्रॅन्च सोडून इतर ब्रॅन्चमध्ये पैसे भरल्यास प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये शुल्क आकारण्यात येईल.