नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याबाबत उद्या आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. तीन दिवसांच्या सुनावणीनंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या सुमारासा निकाल येण्याची शक्यता आहे. जाधव यांची फाशी रद्द करण्याची मागणी भारताने केलीये.


गेल्या वर्षी ३ मार्चला कुलभूषण यांना रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटक कऱण्यात आली होती. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 


या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर उद्या अखेर निकाल लागणार आहे.