नवी दिल्ली :  मोदी सरकारने ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक करणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या सूटपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील कारवाई होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर जास्तीच्या सोन्याचा तपशील देता आला नाही तर कारवाई होण्याची संकेत दिले आहेत. लोकसभेत संमत करण्यात आलेल्या सुधारित आयकर कायद्याच्या अनुषंगाने सरकारने काही महत्त्वाची स्पष्टीकरणे जारी केली आहेत. त्यानुसार ही कारवाई होईल.


महिलांनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून, खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. काही अफवा पसरविल्या आहेत, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. 


कोणाला मिळणार सूट


 आयकर विभागाच्या छाप्यात, घरातील पारंपरिक किंवा पूर्वजांपासून पिढ्यानपिढ्या असलेल्या सोन्याच्या दागिन्यांशिवाय, प्रत्येक विवाहित महिलेला ५००  ग्रॅम म्हणजे ५० तोळे , अविवाहित महिलेला २५० ग्रॅम म्हणजे २५ तोळे, पुरुषाकडे १००  ग्रॅम म्हणजे १० तोळ्यांपेक्षा जास्त सोने जप्त केलं जाऊ शकते. 


विवाहित महिलांना ५० तोळे, अविवाहित महिलांना २५ तोळे आणि पुरुषांना फक्त १० तोळे घरात ठेवता येणार आहे. यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील तर त्याचा तपशील द्यावा लागेल.


 याला टॅक्समघून सूट


घरात पूर्वजांपासून असलेले सोन्याचे दागिने किंवा महिलांनी आपल्या बचतीतून घेतलेल्या दागिन्यांवर कसलाही टॅक्स आकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.