नवी दिल्ली : भाजप नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतूक केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पत्रकारांसोबत बोलतांना हे वक्तव्य केलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की इंदिरा गांधी त्यांना खूप मानायच्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिन्हा यांनी म्हटलं की, ते इंदिरा गांधी यांच्याशी खूप प्रभावित आहेत. इंदिरा गांधी नैतिक मूल्यांवर चालणाऱ्या राजकारणी होत्या. यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. जर इंदिरा गांधी आज असत्या तर मी कदाचित काँग्रेस पक्षात असतो. मी राजकारण हे काँग्रेसच्या सुबोधकांत सहाय यांच्याकडून शिकलो आहे. ही वेगळी गोष्ट आहे की २-३ लोकांमुळे मी भाजपमध्ये आलो आणि आज भाजपचा खासदार आहे.


अनेक भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. पुस्तकाचं प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या हस्ते होणार होतं. निमंत्रण पत्रिकेवरही त्यांचं नाव होतं. पण ते कार्यक्रमाला आलेच नाही. दुसरीकडे व्यस्त असल्याचं सांगून त्यांनी देखील कार्यक्रमाला दांडी मारली.


काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यांच्यासोबत झारखंडचे मंत्री सरयू राय हे देखील मंचावर उपस्थित होते. या दोघांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचं कौतूक करणारे शत्रुघ्न सिन्हा चर्चेत आले आहे.