नवी दिल्ली :  तुम्ही १ जुलैपूर्वी आपले आधारकार्ड पॅन कार्डाशी लिंक नाही केले तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही चालू आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधारकार्ड आणि पॅनकार्ड दोन्ही आवश्यक होणार आहे. 


त्यामुळे केंद्र सरकारने १ जुलै २०१७ पर्यंत सर्व पॅनकार्ड धारकांना आपले पॅनकार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश दिले आहे.  


दरम्यात आधारकार्डाशी पॅनकार्ड लिंक करण्यात अनेक व्यक्तींना अडचण निर्माण होत आहे. अशा व्यक्ती ज्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुका आहेत. 


अनेक व्यक्ती आपल्या नावाचे स्पेलिंग वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. त्यामुळे पॅनकार्डवरील नावाचे स्पेलिंग आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंगशी जुळले नाही तर असे कार्ड लिंक होत नाही. 


तसेच बँक खात्यातील नावाचे स्पेलिंग आणि आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंग यात साम्य नसेल तर आधार आणि पॅन कार्ड लिंक होणार नाही. पॅनकार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्यात दिलेली माहिती मॅच व्हायला हवी. असे नाही झाल्यास तुम्ही आपल्या पॅनकार्ड आणि आधारकार्डात बदल करण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज इन्कम टॅक्स खात्याच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर करता येणार आहे. तसेच आधार कार्डातील माहितीतील बदल करण्यासाठी यूआयडीला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. तसेच यासाठी ऑनलाइन अर्जही करू शकतात. 


सध्या देशात २४.३७ कोटीपेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत. तसेच ११३ कोटीपेक्षा अधिक जणांनी आधारकार्ड बनविले आहे. यातील केवळ २.८७ कोटी लोकांनी २०१२-१३ दरम्यान टॅक्स रिटर्न जमा केले आहे. यात २.८७ कोटी नागरिकांमध्ये १.६२ कोटी लाकांनी टॅक्स रिटर्न जमा केले पण टॅक्स म्हणून एक रुपया पण जमा केलेला नाही. 


मोठ्या संख्येत लोक टॅक्स चोरी करतात किंवा टॅक्स देणे टाळतात. त्यामुळे इन्कम टॅक्स खात्याने रिटर्न भरण्यासाठी आधार लिंकिंग आवश्यक केली आहे. लिंकिंगनंतर टॅक्स चोरी थांबविणे शक्य होणार आहे.