नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 


शेतीसंदर्भातले 20 महत्त्वाचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) 2022 पर्यंत शेतकऱ्यांचा उत्त्पन्न दुपट्टीनं वाढणार


2) कृषीकर्जासाठी ९ लाख कोटी


3) पंतप्रधान पीक योजनेसाठी ५५०० कोटी रुपयांची तरतूद


4) शेतकऱ्यांसाठी विम्याचा हप्ता कमीत कमी असणार


5) कृषीसाठी ३५ हजार ९८४ कोटींची तरतूद


6)  डाळींच्या उत्पादनासाठी ५०० कोटींची तरतूद


7)  5 लाख हेक्टर शेतीवर जैविक प्रयोग राबवणार


8) सिंचनासाठी नाबार्डला २० हजार कोटी


9) २८.५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार


10) मे २०१८ पर्यंत सगळ्या खेड्यांमध्ये वीज पोहोचणार


11) ग्रामीण विद्युतीकरणासाठी ८५०० कोटींची तरतूद


12) बियाणांच्या तपासणीसाठी दोन हजार प्रयोगशाळा


13) शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन, पशुसंजीवनी योजना


14) सॉईल हेल्थ कार्ड देशभरात पोहोचवणार


15) मनरेगा अंतर्गत बांधणार 5 लाख तलाव


16) दुष्काळी भागातल्या शेतीवर विशेष लक्ष


17) दुष्काळी भागासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना


18)पीक वीम्यासाठी 5500 कोटींची तरतूद


19) शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देणार


20) शेतकऱ्यांसाठी स्वास्थ्य वीमा योजना