नवी दिल्ली: नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.


 
 नोटाबंदी निर्णयाचे समर्थन करत लालू प्रसाद आपल्या युती सरकार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या सोबत उभे राहणार आहेत.
 
  विरोधी पक्षातून नितेश कुमारांनीच प्रथम नोटाबंदी निर्णयाचे समर्थन केले तसेच मोदी सरकारचे कौतुक देखील केले. लालूनच्या जनता दल यूनाइटेडने 'जन आक्रोश दिवसा'निमित्त नितेश कुमारांना बोलवण्यात आले होते, परंतु त्या कार्यक्रमास जाणे नितेश कुमारांनी टाळले.  
 
  नितेश कुमारांचे नोटीबंदीच्या निर्णयाचे समर्थन हे बिहारच्या राजकिय वर्तुळात होणाऱ्या बदलांचे संकेत मानले जात आहेत. नितेश कुमार भाजपच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करत आहेत, असे अंदाज बांधले जात आहेत.