नवी दिल्ली : नोटबंदीनंतर म्हणजेच ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत आयकर विभागानं ४ हजार कोटींचा काळा पैसा पकडला आहे. यापैकी 105 कोटी रुपयांच्या नव्या नोटा मिळाल्या आहेत. आयकर विभागाला आत्तापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ४ हजार १७२ कोटी काळा पैसा सापडला. यामध्ये ४५८ कोटी रुपयांची रोकड तर ९१ कोटी किंमतीचे ज्वेलरी मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागानं ८ नोव्हेंबरपासून एकूण ९८३ धाडी टाकल्या तर ५०२७ नोटीस पाठवण्यात आल्या. आयकर विभागानं २५४ केसेस ईडी कडे पाठवल्या असून २२३ केसची चौकशी सीबीआय करणार आहे.