दोन कोटीच्या नव्या नोटा जप्त
राजस्थानची ाजधानी जयपूरमध्ये आयकर खात्याने सर्वात मोठी कारवाई करत कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या संबंधीत संस्थेवर छापा टाकून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे नव्या नोटा आणि दो किलो सोने जप्त केले आहे.
जयपूर : राजस्थानची ाजधानी जयपूरमध्ये आयकर खात्याने सर्वात मोठी कारवाई करत कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या संबंधीत संस्थेवर छापा टाकून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे नव्या नोटा आणि दो किलो सोने जप्त केले आहे.
जयपूरच्या मानसरोवर विल्फ्रेड शिक्षण संस्थेने ९ डिसेंबरला इंटीग्रल कोऑपरेटीव्ह बँकेत एक कोटी तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जमा केल्या होत्या. या नंतर आयकर खात्याने बँक अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यानुसार विल्फ्रेड संस्थेच्या केशव बडाया यांच्याकडून एक कोटी ३८ लाख रुपये जप्त केले.
आयकर विभागाने सांगितले की केशव बडाया यांनी ही रक्कम दुसऱ्या खात्याने अवैधपणे काढू इंटीग्रल को-ऑपरेटीवव्ह बँकेत जमा केले होते. बँकेची ही शाका या शिक्षण संस्थेच्या परिसरात आहे. जप्त करण्यात आलेल्या रक्कमेत २ हजार रुपयांच्या ७ हजार नोटा आहे. केशव बडाया फरार आहेत.
दरम्यान, दुसऱया एक प्रकरणात एका गाडीतून ६० लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. यात ५६ लाख रुपयांच्या नव्या नोटा आहे. हे लोक रस्त्यावर उभे राहून कमीशनर नोटा बदली करण्याचा धंदा करत होते.