नोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत
८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : ८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाचे अधिकारी मागील महिन्यात ज्या लोकांनी मोठी खरेदी केली आहे अशा लोकांची माहिती तपासत आहे. ज्यांचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये जर फरक असेल तर अशा लोकांवर कारवाई होणार आहे. काळा पैसा वटवण्यासाठी जर वस्तूंची खरेदी केली गेली असेल तर अशा लोकांची चौकशी आयकर विभाग माहिती गोळा करत आहे.
आयकर विभाग अशा लोकांची नावे लवकरच वेबसाईटवर टाकणार आहे. कारण अशा लोकांनी केलेल्या खरेदीवर स्पष्टीकरण द्यावं. नोटबंदीनंतर जमा आणि खरेदी रेकॉर्ड आयकर विभाग तपासत आहे. पॅन नंबरच्या आधारावर जमा केलेला टॅक्स रिटर्न ज्यांनी जमा केला आहे. त्यांचं इनकम आणि एकूण खर्च याची माहिती आयकर विभाग तपासत आहे. अडीच लाखाहून कमी पैसे जमा केलेल्यांची देखील चौकशी होऊ शकते.