भारत- बांगलादेशमध्ये होऊ शकतो अणू करार
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नागरी अणू करारावर हस्ताक्षर होऊ शकतात. ७ ते १० एप्रिलला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर येणार आहेत या दरम्यान हे करार होऊ शकतो. यामुळे अणू क्षेत्रात त्रिपक्षीय सहयोगाचा रस्ता खुला होणार आहे.
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नागरी अणू करारावर हस्ताक्षर होऊ शकतात. ७ ते १० एप्रिलला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर येणार आहेत या दरम्यान हे करार होऊ शकतो. यामुळे अणू क्षेत्रात त्रिपक्षीय सहयोगाचा रस्ता खुला होणार आहे.
बांगलादेशमधील रुपपूरमध्ये रशिया अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहे. याआधी भारताने श्रीलंकेसोबत अणू करार केला आहे. बांगलादेश रशियाच्या मदतीने तमिळणाडूमधल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या मदतीने अनुभव घेऊ इच्छितो.
बांगलादेश सरकारमधील एका अधिकाऱ्याने म्हटलं की, "तंत्रज्ञानात प्रशिक्षण फार महत्वाचे आहे. बांगलादेशच्या वैज्ञानिकांना तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात ट्रेनिंग घेणं भाषेच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्ट्या सोपं ठरेल.