गोवा : गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला सुनावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ही इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दहशतवादाशी सामना करतांना वैयक्तीक लाभ-हानीची चिता करणं ही नुकसानदायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम मोदींनी म्हटलं दहशतवादाशी लढतांना फक्त गुन्हा आणि दहशतवाद याचंच मापदंड मानलं पाहिजे. याआधी पाकिस्तानला घेरत मोदींनी दहशतवादाला मिळत असणारी आर्थिक मदत, हत्यारं, ट्रेनिंग आणि राजकारण्यांची मदत हे संपवलं पाहिजे असं म्हटलं. पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षपणे चीनला खडसवलं.


ब्रिक्समध्ये पीएम मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उचलत दहशतवाद आणि सीमेवर दहशतवादाशी लढणं ही ब्रिक्स देशाची प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे.