पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताचे सर्जिकल ऑपरेशन : 10 प्रमुख गोष्टी
उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली.
रणबीर सिंग यांनी परिषदेत माहिती दिली की, आम्ही सर्जिकल ऑपरेशन करुन दहशतवाद्यांचे घुसखोरीचेच मनसुबे उधळून लावले. यादरम्यान अनेक दहशतवादी मारले गेले. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून टाकण्याचा आमचा उद्देश होता. आम्ही पाकिस्तानला या ऑपरेशनची माहिती दिली.
सर्जिकल ऑपरेशनबाबत 10 प्रमुख मुद्दे
1. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला
2. भारताचे पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल ऑपरेशन
3. सीमारेषेवर भारतीय जवानांनी अनेक दहशतवाद्यांचा केला खात्मा
4. या वर्षी 20 वेळा घुसखोरी प्रयत्न हाणून पाडले
5. उरी हल्ल्यानंतर भारतीय सेनेची मोठी कारवाई
6. भारताने सर्जिकल ऑपरेशनपूर्वी अमेरिकेला घेतले होते विश्वासात
7. पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताचे मोठे पाऊल
8. कोणत्याही संकटाशी तोंड देण्यास भारतीय जवान सज्ज
9. भारताने या कारवाईत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले
10. भारताने घेतला पाकिस्तानचा बदला