नवी दिल्ली : भारताकडून ३ चिनी पत्रकारांना बाहेरचा रस्ता  दाखवण्यात आला आहे. यात चीनचं सरकारी चॅनेल शिन्हुआ न्यूजच्या ३ पत्रकारांचा समावेश आहे. व्हिसा कालावधी वाढवण्यास भारत सरकारने  निकार दिला आहे, तसेच या सर्वांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चीनी पत्रकारांचा व्हिसा जुलै महिन्याच्या अखेरीस संपणार आहे . आपला व्हिसा कालावधी वाढवण्याची मागणी या पत्रकारांनी भारत सरकारकडे केली होती. मात्र चीनी पत्रकारांची ही मागणी केंद्राने नाकारली आहे.


३१ जुलैपर्यंत तिन्ही पत्रकारांना देश सोडण्यास सांगितलं आहे. शिन्हुआ न्यूजच्या दिल्ली ब्युरोचे प्रमुख वू कियांग आणि मुंबईतील पत्रकार तांग लू आणि मा कियांग या तिघांना हे आदेश देण्यात आले आहेत. 


भारत आणि चीन या देशातील संबंध  काही वर्षांपासून तणावपूर्वक राहिले आहेत. व्हिसा वाढवण्याची मागणी नाकारण्याचं ठोस कारण अद्याप स्पष्ट नाही. चीनी दूतावासाने हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयासमोर उचलून धरलं आहे.


भारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनने आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईनंतर हे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.