हैदराबाद : १८ जून हा दिवस भारतीय वायूदलासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी वायुदलात प्रथमच तीन महिला पायलट फायटर विमान चालविणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशातील अवनी चतुर्वेदी, बिहारची भावना काथ आणि राजस्थानातील मोहनासिंग या वायुदलात फायटर पायलट म्हणून दाखल झाल्या आहेत. या तिघींचे प्रशिक्षण नुकतेच संपले असून त्या उद्या या विमानाचे सारथ्य करणार आहेत.


संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओसा यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघीजणींना मार्चमध्येच कमिशन दिले गेले होते.


भारतीय वायुदलात सध्या १५०० महिला कार्यरत आहेत. १९९१ पासून महिला हेलिकॉप्टर पायलट व ट्रान्स्पोर्ट पायलट म्हणून कार्यरत आहेत. मात्र प्रथमच महिला पायलट फायटर विमानांचे उड्डाण करणार आहेत.