नवी दिल्ली : पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी भारत देखील पूर्णपणे तयार झाला आहे. उद्याजर युद्धाची वेळ आली तर भारताकडून युद्धाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारत सरकारने सगळ्या शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अतिरिक्त शस्त्रे पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात सुरु असलेल्या हालचाली आणि दहशदवाद्यांच्या कारवाया पाहता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघांचा ब्लॅक लिस्टेड दहशतवादी बुरहान वाणीला पाकिस्तानकडून हिरो बनवलं जातंय. भारत सरकार देखील अशा भारत विरोधी कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. पाकिस्तानला शांती आणि सद्भावाची गोष्ट कळत नाही. त्यामुळे भारत सरकारने शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना सूचना दिल्या आहेत की आपल्याला कमी वेळात जास्त शस्त्रसाठा पुरवठा करण्याची तयारी केली पाहिजे. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात हत्यारं पुरवठा करु लागू शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात हत्यारांचं उत्पादन करु लागू शकतं.


सरकारने कमी वेळात जास्त हत्यारांचं कशा प्रकारे उत्पादन होऊ शकतं याबाबत माहिती मागवली आहे. कारण वेळ आल्यास प्रत्येक परिस्थितीशी सामना करता यावा.